सैराट......

Started by chandrasen, May 31, 2016, 12:38:30 PM

Previous topic - Next topic

chandrasen

                ज्या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला याड लावलं,  ज्या अजय आणि अतुल यांच्या अफलातुन सुरांनी सा-या जगाला वेड लावलं. आणि प्रत्येकाच्या तोंडी आजही एकच शब्द घुमतोय तो म्हणजे सैराट. चित्रपट पाहिला  खरचं मनाला सैराट लागलय, अगदी वास्तववादी लेखन केलंय. खरंच प्रेम कसं करावं आर्चीकडून शिकावं आणि निभवावं कसं हे परशा कडून शिकावं याचं एक उदाहरण या चित्रपटातुन मांडलंय.गावाकडचं प्रेम आणि त्यात येणारी संकटं याच एक जागतं उदाहरण तरुण पिढीला दिलय. कारणं आजकाल प्रेमाचा बाजार मांडणारी पण बरीच दिसतात. पण खरं मनापासून प्रेम करणारी मात्र मोजकीच असतात. प्रेम करत असाल तर येणारी संकटे पचवायची धमक पण असली पाहिजे.चित्रपट प्रदर्शित होण्याआधी खुप काही वाईट बातम्या ऐकल्या होत्या सैराटबद्द्ल पण मुळात  सैराट जसा दिसतो तसा नाहीय. मला वाट्तं कदाचित लोकांनी त्याचा चुकीचा बोध घेतलाय. पहिली बाजू प्रेमाचा अवखळपणा, मौजमजा भले दाखवली आहे. पण प्रेमाने पोट भरत नाही , त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते जी आर्ची ने बरोबर आणलेल्या पैशापेक्षा कितीतरी पटीने मोठी असते हे पाहणं गरजेचं आहे , मोठ्या कुटुंंबात राह्णारी ,बुलेट चालवणारी  आर्ची हिने बालवयातील घेतलेल्या चुकीच्या निर्णयाने काय हाल होतात यातुनच ख-या अर्थाने बोध घेण्यासारखं आहे., नंतर जरी ती स्थिर झाली तरी दोघांच्या कुटुंबाचे झालेले हाल हा त्यांच्या प्रेमाचाच दोष होता का? राजकीय वर्तुळात वावरणा-या तिच्या वडीलांना पदोपदी मानहानी पत्करावी लागली आणि अतिशय गरीब , परश्याच्या कुटुंबाची तर वाताहात झाली , यासाठीच प्रेम करायचे असते का ? आपल्यासाठी काबाडकष्ट करणा-या , आपल्या कडून अनेक अपेक्षा ठेऊन सुखी आयुष्याची स्वप्न बघणा-या परशाच्या आईवडीलांचं कुठे चुकलं ? प्रेमासाठी जीव देण्यात शहाणपण नाही तर ज्या आईवडीलांनी आपल्या जन्मापासून आपल्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी जगावं आणि त्यांनाही सन्मानानं जगवावं  हा सैराट चित्रपटातून बोध घेण्यासारखा आहे असं मला तरी वाटतं.बरेचजण म्हणतात बालवयात नको असणारे चाळे या चित्रपटात दाखवलेत, त्याचे मुलांवर काय संस्कार होणार, मुलांच्या मनावर याचा कीती वाईट परिणाम होईल. आज काल चे पालक मर्डर , क्या कुल है ह्म, या सारखे हिंदी चित्रपट अगदी बिंदास पाहण्यास परवानगी देतात. पण एका मराठी माणसाने मराठी चित्रपटातून एक वास्तव मांड्लं त्याला लगेच टीका करतात. मला तरी वाट्तं पालकांनी मुलांना हा चित्रपट आवर्जून दाखवावा कारण चुकीच्या निर्णयाने पुढे उदभवणारी संकटे तरी कळतील. स्वताचे निर्णय स्वता घ्यायचे असेल तर आधी स्वबळावर उभं राहता आलं पाहिजे. स्वताच्या जबाबद-या कळ्ल्या पाहिजेत. असं मला या चित्रपटातुन जाणवलं.

                       मला असं वाटतं या बालवयातून जात असताना प्रत्येकजण यामध्ये कधी ना कधी आपसुक आकर्षिला जात असतो (अपवाद असतील काही मी सर्वांनाच असं म्हणतंं नाही) काहींच प्रेम पूर्ण होतं तर काहींच अपूर्ण राहतं तर काहींचा नुसता टाईमपास असतो. कारण ते वयच तस असतं कसलं ही भान नसतं, कोणाच्या बंधनात रहायला मन तयार नसतं.ते कुठं ना कुठं तरी भरकटच असतं.कीती ही मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते भरकटतच असतं यात मुलांचा ही दोष नसतो. पण त्यांनी ही थोडा फार विचार करणं गरजेचं आहे.सर आपण एक वास्तववादी आणि काळजाला भिडणारं लेखन केलंत. मैत्रीचं नातं अफलातून मांडलतं. खरंच प्रत्य्रेकाच्या आयुष्यात सल्या आणि लंगड्यासारखे जीवाला जीव देणारे मित्र असायलाच हवेत.

                       एका गरीब कुटूंबात झालेला  जन्म आणि त्यातच लहान वयात लागलेली नको ती व्यसने या सर्वावर मात करत  फुले,शाहू,आंबेडकर या थोर निष्ठावादी लोकांचे विचार आचरणात आणून त्यांचा गाढा अभ्यास केला वाचनाचा छंद जोपासला. त्यामुळेच आम्हाला आज एका वडार कुटुंबात जन्माला आलेला आणि अनेक संकटांवर मात करुन पुढे आलेला. सलग दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळ्वून देणारा दिगदर्शक आणि असा दिगदर्शक की, ज्याच्या चित्रपटातील गीतांचे प्रथमच भारताबाहेर गायन झाले ज्याला विदेशातील लोकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला असा मराठी चित्रपट सुष्टीला मिळालेला एक हिरा (अवलिया) सैराटच्या निमित्ताने का होईना पण नागराज मंजुळे आज आम्हाला कळला.

                                                                                                                                                                  - चंद्रसेन सि.जाधव.