तुझ्या आठवणी

Started by Vaishnavi Dilip Dhumane, May 31, 2016, 12:52:59 PM

Previous topic - Next topic

Vaishnavi Dilip Dhumane

    तुझ्या आठवणी

आठवणी तुझ्या त्या सावरताना
काय वाटले कसे मी सांगू
दाटून आलेल्या कंठातून
कशा मी भावना व्यक्त करू...

अबोल झालेत शब्द माझे
कसे त्यांना बोलके मी करू
होते फक्त ते तुझ्याचसाठी
कसे त्यांना मी सत्य सांगू...

सोनेरी त्या आठवणी
कसे बरे त्यांना लपवू
किती लपवले तरी त्या
मनाच्या कोपऱ्यातून येऊ पाहू...

डोकावतात त्या कोणत्याही क्षणी
घेऊन एक खोटे आश्वासन
भरून येतात डोळे मग
अन वाहून जाते ते आश्वासन...

सोनेरी त्या आठवणींना
सोनेरी एक कुलूप घातले
सोनेरी त्या स्पर्शाने उघडावे
हेच एक वेडे मागणे...!!!


- वैष्णवी दिलीप दुमणे