नाते तुझे नी त्याचे

Started by कैलास बगनावत, June 01, 2016, 04:12:56 PM

Previous topic - Next topic

कैलास बगनावत

तु मागता भैरवी,तो मालकंस गातो
तु होता कोकीळा,तो राजहंस होतो.
तु दुखाःवेगे अश्रु गाळीता,तो मंद गालात हसतो,
तु गच्च डोळे मिटता,तो पापणीत येवुनी बसतो.
तु होता मिरा,तो करुणेचा पान्हा होतो,
होताच राधा तु,तो कान्हा ही  होतो.
नाते तुझे नी त्याचे आहे असे आभासी,
इंद्रधनुष्याचे नाते असते जसे नभाशी.

                    कैलास बगनावत
                        ९७६६६७३७८७