ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, June 02, 2016, 10:33:26 AM

Previous topic - Next topic

Lalit kumar

संविधानाचा मार्ग धरूनी
चला विकासापर्यंत जाऊ
जात धर्म हे पंथ सोडून,,
चला आपसात प्रेमाने राहू,!

कटूतेचे हे बंध तोडून
चला सुंदर गोडवनात जाऊ
पशू पक्षाच्या संगतीने,,
चला सुख-शांती गीत गाऊ,!

शिक्षणाचा दिवा पेटवून
चला घराघरा प्रकाश नेऊ
दिव्य त्या प्रकाशातून,,
चला बुध्दीला धार लावू,!

बाळगू प्रगतीवादी विचार
चला आधुनिकते कडे जाऊ
विज्ञानाच्या चष्मातुंन !,,,
चला भविष्य आपल पाहू,!

गरजवंताचा हात धरून
चला माणूसकिकडे जाऊ
आपूलकीची तोफ लावून
चला सारे जग जिंकून घेऊ,!

ललित कुमार
wapp7744881103
*******************