मेहंदी

Started by पल्लवी कुंभार, June 02, 2016, 12:10:13 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

रंग रंगात रंगली साजणा
मेहंदी तुझ्या नावाची तळहातावर या
जमल्या सर्व प्रिय सख्या
छळतात का रे नावे तुझ्या
आली आई, मामी-मावशी
सोबतीला संगीतसभा
मेहंदीचा वास पसरला
दशदिशांत घमघमे सारा
कुठे कोयरी तर कधी सनई
थुईथुई नाचे मोर मेहंदीत माझ्या
बोटाला सजली वेलबुट्टी
त्यात दडले नाव तुझे प्रिया
खोल सख्याच्या प्रेमाचा
चढला रंग मेहंदीला
घेता वास या तळहातांचा
उतरे मोहक वास श्वासात
घेऊन हात हाती साजण
न्याहाळे रंग मेहंदीचा
का उगा मन बावरले
चढला शहारा रोमारोमांत या
शोभे साजरी मेहंदी न्यारी
मिसळला हात हातात तुझ्या
पसरला रंग गुलाबी हवेला
जेव्हा रंगे मेहंदी तुझ्या नावे, प्रियकरा

~पल्लवी कुंभार