तिरस्कार असणारी नोट.

Started by kavi_paragzope, June 02, 2016, 05:22:15 PM

Previous topic - Next topic

kavi_paragzope


तिरस्कार आहे मला
अशा नोटचा जि मनं दुःखवते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि नात्यात दुरावा आणते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि लालच दाखवते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि जीवही घेते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा प्रेमालाही विसरवते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि झोप हिसकावते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि माणसाला काहीही करायला मजबूर करते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा माणसाला गर्वात लोटते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा समभाव विसरवते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि एखादया भिका-याकडून भिक मागवते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि गरिबांना शिक्षणातुन हटवते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि मनुष्याला हैराण करुन सोडते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि खराब सवयी लावते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि भेदभाव करते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि कधी गरजवंताला मिळत नसते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि मनुष्याला कुठेही झुकवते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा जि माणसाचा जीव घेते.
किती वाईट ही कागदाची नोट जि हसत्या - खेळत्या जीवनाला संकटात टाकते.

तिरस्कार आहे मला अशा नोटचा,
तिरस्कार आहे।
। कवि पराग झोपे ।

rohit Kshirsagar