येशील का रे ?

Started by शिवाजी सांगळे, June 04, 2016, 07:15:19 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

येशील का रे ?

आळवणी आर्त ही
ऐकून मज पामराची
तारण्या सृष्टी सारी
पावसा येशील का रे ?

धीर विझल्या स्वप्नांना
बळ थोडं जगण्याला
फेडण्या पांग मातीचे
पावसा येशील का रे ?

सावळ्या नभां सोबती
रिझविण्या काळ्या आईस
करण्या सुजलांम सुफला
पावसा येशील का रे ?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९