फीतूर झालेल्या दर्पणाने

Started by sameer3971, June 04, 2016, 11:48:12 AM

Previous topic - Next topic

sameer3971

तुझे रूप विसरायचे म्हणून
आरश्यात जेव्हा मी पाहीले
फितूर झालेल्या दर्पणाने
फक्त तुझ्याच छबीला दाखवीले

सलगी तुझी नकोच म्हणून
दुरवर झोपडे मी बांधले
फितूर झालेल्या मग वार्याने
बिलगून स्पर्शात तुझ्या मोहवले.

आर्जवे तुझी नकोत म्हणून
गाण्याचे व्यसन मी सोडीले
फितूर झालेल्या स्वरांनी पण
फीरून झंकार तेच छेडीले

नृत्य आठवणींचे नकोत म्हणून
माझ्याच नाचात मी गुंतलो
फीतूर पैजणांच्या आरवाने
पदरव तुझेच पण गुंजले

कळून चूकले माझे मलाच
स्वताःला कितीही मी कोंडले
फीतूर अंधाराने सावलीस सुद्धा
तुज छायेस अवचित जोडले

समीर बापट
मुंबई
4 जून 2016.