नसे कविता हि .....

Started by Ashok_rokade24, June 05, 2016, 03:27:15 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

नसे कविता ही, नसे कल्पना,
शब्द जाहले अंतरीच्या भावना ॥
स्पर्श वाटला हवासा जेव्हा मायेचा,
हात मिळाला आधारा सहानुभूतीचा॥
मिटल्या डोळ्यात स्वप्न जे पाहिले
उघडताच नयन अश्रू बनून वाहीले ॥
पंचपकवानाचे ताट जरी भरलेले
फीरवून हात मायेने न कुणी भरविले॥ 
चव आठवेना दुधाची जे केव्हा तरी मिळाले
तृप्त भासलो कितीही दुध पाण्याचे न झाले ॥
भयभीत मन माझे स्वप्नी जे पाहीले
पांघरून अंगावरचे आसवात चिंब झाले॥
भिंती चहु दिशांनी छप्पर जरी माथी
ऊन वादळ वारा तडाखे सोसले किती॥
हुंदका अडला ऊरी वेदना असह्य झाली
आसवांना ऊरीच्या मोकळी कुस न मिळाली ॥
कमजोर माझे बाहू ओझेही जड झाले
जगणे जगविण्यात जिवनहि सरत आले॥
येई कधीतरी झुळुक लुप्त अचानक झाली
नयन शुष्क जहाले आसवे जळून गेली ॥
नयन शुष्क जहाले आसवे जळून गेली॥

               अशोक मु.. रोकडे
                ९२२४१८४७९३

मिलिंद कुंभारे