एक तरी झाड लावु

Started by Dnyaneshwar Musale, June 05, 2016, 04:15:38 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

झाड हे श्वास
ताटातला घास
चंदनाचा वास
जगण्याचा सहवास.

नसे काही निरुपयोगी
कण कण उपयोगी
चाखावी रसाळ फळे
वाढता वनराई
पाझरल तळे.

कोणी येई नंग्या पावली
विझवुन आग झाड देई  सावली
कोण्या कंपनीची  नसे निर्मिती
रुजुन बीज अंकुरते माती.

चालुन कुऱ्हाड
झाली काटछाट
हरवलं रान
पावसानं फिरवली पाठ
दुष्काळानं अडली वाट
जंगलं न व्हावी भुईसपाट.

झाडं देतात प्राण वायु मोफत
मग कशाला बसशील दवाखान्यात खोकत
आता  एक तरी झाड लावु
झाडांची काळजी सारे मिळुन घेऊ.