सांग ना सखे कोण आहेस तु?

Started by Basavraj Bhimanavaru, June 05, 2016, 11:21:46 PM

Previous topic - Next topic

Basavraj Bhimanavaru

सांग ना सखे कोण आहेस तु?
आज तुला पहिल्यांदा पाहिलो तर
पाहतच राहावस का वाटल,
स्वाप्नांच्या दुनियेत
मन माझे हे आनंदाने का फुलुन उठल...

सांग ना सखे कोण आहेस तु?
तुझा तो निरागस चेहरा
नेहमी डोळ्यासमोर का येतो,
तुला समोर पाहतच
तुझ्या त्या पाणीदार डोळ्यात
स्वताला का मी शोधतो...

सांग ना सखे कोण आहेस तु?
तु एक दिवस जरी दिसली नाही
तर तुलाच का मी शोधत राहतो,
तुला शोधता शोधता
तुझ्या आठवणीत स्वताला का मी हरवतो...

सांग ना सखे कोण आहेस तु?
तु जेव्हा जवळ नसतेस
तेव्हा मन का हे उदास होते,
सार काही जवळ असताना
काही तरी हरवल्याचा भास का होते...

सांग ना सखे कोण आहेस तु?
तु येणाऱ्या वाटेवर
वाट का मी पाहतो,
तु येणार नाहीस हे काळताच
तुझ्या आठवणीत का मी रडतो...
सांग ना सखे कोण आहेस तु?
सांग ना सखे कोण आहेस तु?
                        -बसवराज भिमणवरू
                        9049373372
         basavraj.bhimanavaru.3@facebook.com
Basavraj Bhimanavaru
9049373372