पहिलं प्रेम

Started by Vikramsingh, June 06, 2016, 06:08:23 PM

Previous topic - Next topic

Vikramsingh

पहिलं प्रेम...

असा काळ आहे जो भुत बनुन केंव्हा मानगुटीवर बसला ते कळलचं नाही तो भुतकाळ म्हणजे पहिलं प्रेम....

कितीक काळ लोटला , भुतकाळातली प्रत्येक गोष्ट सुटली पण ज्याने मात्र माझी पाठ कधीच नाही सोडली ते पहिलं प्रेम...

आयुष्यात खुप चांदण्या चकमक चकमक करून अदृश्य झाल्या पण ध्रुव ताऱ्यापरी अढळ राहीलं ते पहिलं प्रेम....

चारचौघात कधीच न बोलणाऱ्या मितभाषी व्यक्तीलाही आपले विचार शब्दात गुफांयला शिकवते ते पहिलं प्रेम....

चेहऱ्यावर हसु मिरवत जगातला सर्वात सुखी मानवालाही एकांतात हळवं व्हायला लावतं ते पहिलं प्रेम...

प्रचंड तणावातही क्षणाची का होईना पण हवी हवीशी वाटणारी उसंत म्हणजे पहिलं प्रेम....


आणि सुखी समाधानी आयुष्यातही दुःखाचं गालबोट लावणारं जे असतं ते पहिलं प्रेम....


काय सांगु कसं सांगु काय असतं पहिलं प्रेम
एकुणच काय लांबलचक आयुष्यातील अनेक प्रश्नचिन्ह, स्वल्प अल्प विरामानंतर येणारा शेवटचा फुलस्टॉप असतं पहिलं प्रेम ,
शेवटचा फुलस्टॉप असतं पहिलं प्रेम ,
शेवटचा फुलस्टॉप असतं पहिलं प्रेम ,


विकी...