तुझ्या छत्रीत

Started by Dnyaneshwar Musale, June 08, 2016, 07:51:16 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

👵पावसात मी
फसले होते,
येऊन छत्रीत
तुझ्या हसले होते.

👴माझ्या छत्रीत
जागा कमी होती,
तु भिजनार नाही
याची हमी होती.

👵जलधारा स्तिरावल्या पण
छत्री माझ्या शिराशी राहिली,
प्रेम काय असतं
याची चाहुल मी आज पाहिली.

👴विसावल्यात  धारा 
हे नव्हत   मला कळलं,
उन्हा पावसात
तुझ्या साथीच गणित होतं जुळलं.

👵पावसाला सांग
रोज असाच येत जा,
छत्रीच्या आडोशाला
रोज घेऊन जात जा.

👴तु येत नाही तोपर्यंत
तो ही निपचीप असतो,
माझ्या सारखच तो ही
तुझीच वाट पाहत बसतो.