रायगड (जुन २०१६)

Started by swara, June 08, 2016, 10:52:35 AM

Previous topic - Next topic

swara

अप्रतिम अनुभव होता राज्याभिषेकाचा, आम्ही पोहचलो 4 वाजता, होळी च्या माळावर ढोल ताशे मैदानी खेळ तलवारी, दंडपट्टे, लाट्या खेळायला सुरवात सुरवात झाली होती. जबरदस्त वाटत होता, सगळे ढोलताश्याच्या तालावर नाचत होते.
युवराज छत्रपती संभाजी राजे(कोल्हापूर चे राजे,करवीर गादीचे वंशज) आणि शहाजी राजे (संभाजीराजांचे पुत्र) गड चढून होळी च्या माळावर दाखल झाले. सगळं पब्लिक त्यांना भेटायला धावलं. राजे सगळ्याना भेटले. आम्ही पण भेटलो. त्यांच्या चेहरयावर ते राजे असल्याचा तेज झळकत होता. तो माणूस बघताच रॉयल वाटतो. माहित नाही हे सगळ्यांना वाटलं असेल कि नाही पण मला वाटले कदाचित कोल्हापूरशी असलेला नातं या मागचा कारण असावं.

मग आम्ही tent लावला. बॅग्स वगैरे टाकल्या आणि परत राजसदरेत जाऊन बसलो. तिथे राजे आज बाकीचे मान्यवर होते. हिवरेबाजार या आदर्शग्राम चे सरपंच पोपटराव पवार यांचं 'शिवाजीराजेंची ग्रामनीती पर्यावरण नीती यावर व्याख्यान होतं. पोपटराव पवार माहित नसतील तर गूगल करा. भारी माणूस आहे. नंतर शाहीर आले होते त्यांनी पोवाडे गायला सुरवात केली, पब्लिक असली येडी झाली होती मस्त माहोल झाला होता.
मग आम्ही परत फिरलो, तिथेच थोडावेळ भटकलो. गडावर जेवायची सोय होती पण प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही गेलो नाही, सोबत आणलेले केक आणि खाकरा खाल्ले.
मग TENT मध्ये झोपायला गेलो, सकाळी 5.30 चा अलार्म लावला.
सकाळी जाग आली तेव्हा बारीक पाऊस पडत होता.
मग फ्रेश होऊन tent मध्ये बॅग्स ठेवल्याआणि पटपट निघालो कारण पुढे बसून सगळं बघायचा होता. खुप उत्सुकता होती.
एवढ्या लवकर जाऊन पण आम्हाला पुढे बसायला जागा मिळाली नाही.मग राजसदरेच्या रस्त्यावर एका बाजूला बसलो. तिथे बसून देत नव्हते. माझ्यामित्राला रोहित ला मागे पाठवला माझ्याकडे कॅमेराचा मोठी लेन्स होती ते बघून त्याने मला फोटोग्राफर समजून तिथेच एकबाजूला जागा दिली. त्या जागेवरून मी शेवट पर्यंत हललो नाही.

मग सकाळ पासून मेघडंबरीवर सजावट चालू होती. दगडूशेठ गणपतीची सजावट टीम यावर्षी आणि इथून पुढे मेघडंबरी ची सजावट करणार आहेत. भारी सजवली होती मेघडंबरी.

6 वाजल्यापासूनच शाहीर पोवाडे गायला सुरु झाले होते
पानिपत युद्धामध्ये जी मराठी कुटुंब तिथे स्थायिक झाले होते त्यांचे 50 वंशज आज रायगडला आले होते फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांना आणि संभाजी राजाना बघायला. हे लोक स्वतःच्या नावापुढे मराठा असा शब्द अभिमानाने लावतात. त्यांचा उत्साह कमाल होता.
शाहिरांनी त्यांच्यासाठी हिंदीतून छोटा पोवाडा सादर केला ते सगळे वंशज अभिमानाने अजून फुलून गेले.

आता वेळ आली होती शिवरायांच्या पालखीची.

नागरे वाजत वाजत पालखी राजसदरेतून येत होती आणि तेव्हाच एका मावळयाने आस्ते कदम, आस्ते कदम.... म्हणायला चालू केलं..अंगावर काटा येतो असा काही बघितला कि...
मग त्यामागून संभाजी राजे शहाजी राजे आले. संभाजी राजेंना बघायला आणि पालखी चा दर्शन घ्यायाला सगळे वेडे झाले होते. शहाजी महाराज राजसदरेतून आले, CM आणि बाकीचे नेते मागच्याबाजूने आले. संभाजी राजे शहाजी राजे आणि CM मेघडंबरी जवळ पालखीतून आणलेल्या महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्यासाठी वर आले. तेवढ्यातच पाच वेगवेगळ्या गडावरून पाणी घेऊन लोक आले. कवड्यांचा मोठा हर घेऊन एक माणूस आला.
मग महाराजांच्या मूर्तीवर या पाण्याचा अभिषेक झाला पूजा झाली. आता संभाजी राजे आणि CM मेघडंबरी वर गेले महाराजांच्या मुर्ती जवळ, आता महाराजांच्या मोठ्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होणार होता. संभाजीराजांनी सुवर्णमुद्रा असलेल्या ताटातून सुवर्णमुद्रांचा अभिषेक महाराज्यांच्या मूर्तीवरून केला. अविस्मरणीय क्षण होत तो!! कधीही अनुभवला नव्हता असा. डोळ्यासमोर खऱ्या राज्याभिषेकवेळी काय झालं असेल दिसायला लागलं. समस्त शिवप्रेमी चिडीचूप होऊन ते सगळं अनुभवत होते. अंगावर काटा आला होता.अप्रतिम सोहळा पार पडला होता- राजं छत्रपती झालं होतं

हा राज्याभिषेक सोहळा ज्यांच्या अथक प्रयत्नातून पुढे आला आणि महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनासाठी जे सतत प्रयत्नात आहेत ते युवराज संभाजी राजे यांना शिवप्रेमी केवळ शिवाजी महाराजांचेे वंशज नव्हे तर त्यांच्या विचारांचे देखील वंशज मानतात.

CM पेक्षा जास्त मान शिवप्रेमी संभाजीराजेंना देतात.
काल जेव्हा CM बोलायला लागले तेव्हा पब्लिक मराठा आरक्षण वर दंगा करायला लागला संभाजी राजेंनी सांगितल्यावर सगळे गप्प बसले.

एक अविस्मरणीय क्षण अनुभवता आला मला.
सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत मी एका जागी बसलो होतो. इतर वेळी हे मला शक्यच झाला नसता पण काल मी बसलो.

लाखो लोक आले होते. आमच्या बाजूचा टेंट होता त्यात एक फॅमिली होती साधारण आपल्या आई वडलांच्या वयाचे असतील आणि त्याची आपल्याएवढी मुलं. हे सगळे फक्त राज्याभिषेकासाठी औरंगाबाद वरून आले होते. असे किती लोक होते किती तरी आजी आजोबा. आणि हे सगळे रायगड चालून आले होते. कारण रोपवे रात्री 9 पर्यंत बुकिंग असल्यामुळे बंद होता. असे कितीतरी लोक होते. उस्मानाबाद वरून तब्बल 350 ट्रॅक्स गाड्या आल्या होत्या.
सध्या काहिलोक तक्रार करतात कि सध्याची नवी  पिढी ला काही घेणदेण नाही इतिहासाच ,पण काल रायगड ला येऊन पाहायला हवं होता कि आजची पिढी मागच्या पिढीपेक्षा जास्त आकर्षित महाराजांबाबत.

एक अविस्मरणीय सोहळा बघायला मिळाला खूप भारी वाटतं
य!

                                 - vishwajit bhoite