मैञीची महादेव कुंटे मो, 9075197777

Started by Kunte mahadev, June 09, 2016, 07:35:40 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

मैत्रीची परी

माझ्या आयुष्याच्या दारावर
मैत्री ची चाहूल झाली,
मैत्रीच वरदान घेऊन
मैत्रीची परी आली.

अनोळखी होतो मी
अनोळखी होती ती,
माझ्याशी मैत्री करून
आयुष्य बदलून गेली.

सौंदर्याच फूल होती ती
माझ्या ओसाड पडलेल्या
मनाच्या रानात मैत्रीची
बाग फूलवून गेली.

तिच्या साठी बच्चा होतो मी
तिच्या साठी बावळट होतो मी
पण मना मध्ये पवित्र
मैत्रीच्या प्रेमाची शिकवण
घेऊन आली.
 

मला समजून घेतल तिने
माझ्या चुका सहजपणे
माफ करत आली.

माझ्या आयुष्याच्या दारावर
मैत्री ची चाहूल झाली,
मैत्रीच वरदान घेऊन
मैत्रीची परी आली.
कवी---महादेव कुंटे मो,9075197777

Kunte mahadev

मैत्रीची परी

माझ्या आयुष्याच्या दारावर
मैत्री ची चाहूल झाली,
मैत्रीच वरदान घेऊन
मैत्रीची परी आली.

अनोळखी होतो मी
अनोळखी होती ती,
माझ्याशी मैत्री करून
आयुष्य बदलून गेली.

सौंदर्याच फूल होती ती
माझ्या ओसाड पडलेल्या
मनाच्या रानात मैत्रीची
बाग फूलवून गेली.

तिच्या साठी बच्चा होतो मी
तिच्या साठी बावळट होतो मी
पण मना मध्ये पवित्र
मैत्रीच्या प्रेमाची शिकवण
घेऊन आली.
 

मला समजून घेतल तिने
माझ्या चुका सहजपणे
माफ करत आली.

माझ्या आयुष्याच्या दारावर
मैत्री ची चाहूल झाली,
मैत्रीच वरदान घेऊन
मैत्रीची परी आली.
कवी---महादेव कुंटे मो,9075197777

कविता


[कवी] महादेव कुंटे मो, 9075197777

अंधार फार झाला
थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला
पणती जपून ठेवा  अंधार फार झाला

आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला

काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला

हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात
ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला

वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची
स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला

हे  वाटतील परके आपुलेच श्वास आता
हातात हात ठेवा अंधार फार झाला

शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला

बाजार हा फुलांचा येथे फुलेच विकती
कलिका जपून ठेवा अंधार फार झाला

ह्रदयात पाळलेल्या जखमातुनीच आता
कंदील एक लावा अंधार फार झाला
कवी---महादेव कुंटे मो,9075197777

कविता

कवी~महादेव कुंटे
तू गेली तेव्हा
तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
श्वासाच्या अधरावरती
मन झोका घेत होता

तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
प्रेमाच्या त्या विरहात
मन हेलकावत होता

तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
अंधाराच्या त्या झगमग तारा
झुळूक घालती मृगजळ वारा

तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
आकाशाच्या मृदगंध सारा
झुळझुळ वाहे ओढा ओला
तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
प्रेमाच्या त्या प्रतिकासाठी
मन भावनाविष होता..

Ravi Padekar

मराठी लेख मध्ये कविता अपलोड करू नये... कवितेच्या टॉपिक मध्ये  आपल्या कविता अपलोड करावे...!!!

shyam holkar

 
प्रेम करावस वाटत
तुला चोरून बघताना
मला खुप बर वाटत,
तुझ्या मागुन फिरताना
तुझ्या सोबत फिरावस वाटत,
तुझ ते निरागस हास्य
...निहारून पहावस वाटत,
हातात हात घालून
तुझ्या सोबत चालावस वाटत,
तुझ्या त्या लाजन्या कड़े
एकटक पहावस वाटत,
तुझ्या समोर उभा राहून
तुझा चेहरा मनात भरावसा वाटत,
मला खुप खुप खुप
तुझ्या सोबत बोलावस वाटत,
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत,
खरच
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत....

Mahadevkunte

एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी
प्रेम करण्यासाठी.आणि,
आयुष्य लागते, त्याला विसरण्यासाठी
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

कविता प्रेम

मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.


कविता प्रेम

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकढे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरील राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.

कवी-महादेव कुंटे मो, 9075197777