पावसाच्या सरी

Started by Minakshi Pawar, June 10, 2016, 05:56:22 PM

Previous topic - Next topic

Minakshi Pawar

                  पावसाच्या सरी

धगधगती ही धरणीमाता
पावसाची वाट बघते आता
पावसाच्या सरी झरझर येतील
धरणी मातेची तहान भागवतील
अरे अरे ढगा कधी रे येशील
सरीवर सरी कधी रे देशील
पाऊस आला आनंद झाला
मातीचा बघा सुगंध दरवळला
धरणीला ह्या पडलेल्या भेगा
बुजुन निघाल्या आता बघा
हिरवागार शालु भुमीने पांघरला
राजा शेतकरी मनोमन बहरला
झरझर झरझर पावसाच्या सरी
ढग आले पळत पळत आपल्या दारी
मन गेले भिजुन झाले ओलेचिंब
निघून गेले ढग लांबच लांब.

            सौ. मीनाक्षी मोहनराव पवार
                    अमरावती
                 ९५५२६५९०११