एक खंत

Started by nirmala., December 28, 2009, 01:08:54 PM

Previous topic - Next topic

anolakhi

खर तर लिहान्याचे थाम्बवले होते कही दिवसांसाठी,पण तुझा हा लेख वाचून रहावले नाही.


दिवस होते सोनियाचे,
फिरन्याचे,खेळन्याचे,हसण्याचे,आणि उगी आसव वहावन्याचे,
दिस ते हिरावले कोणी मज पासून,
ओळख न उरली आता मलाच मज पासून...
न होती काळजी कसली,
न होती स्वप्न ती फसवी...
निरागस डोळे जे जागे सदासाठी,
कोणी झोपिवले मग मज,त्या फसव्या स्वप्नांसाठी...
नको ती माया,नको ते नाव...
परत करा मला माझे ते गोष्टितले  राजा-राणीचे गाव....

thanks for taking us to that own old days...

rudra


shardul

थैंक्स निर्मला. आज जुन्या दिवसांची आठवन मानत जगी जाहली आहे. ते सोनेरी दिवस आज परत आठवले. शिवाय तुमची लेखन पद्धत सुद्धा साधी व मानत खोलवर ठसा उमटवणारी आहे.
लेख अप्रतिम आहे व अजून असंच मनाचा वेध घेणारे लेख लिहा हि विनंती.

rajeshkolhe007

#23

Dear Nirmala,

Thanks! khupach chhan lihales tu shalechya aani college chhya divsa baddal...Jase kahi mazyach college chya divsa baddal lihates aase waatale..

Rajesh Kolhe - Hyderabad...

sksavita2006

Good Morning,

Thanks,
गेलेले दिवस आठवतात आणि तेच खूप चांगले होते असे अनेकदा वाटते.
Thanks agains.

Savita.

:) :) :) :) :) :) :)

nirmala.

thanx to all my MK frnds for your lovely reply.

nirmala. :)

VIRENDRA

Hello Nirmala...........

Aaj aamhi pan ' RANKELA' lagloy asa sarvajan mhantat.
Bhutkalatlya school,college chya diwasanchi gammatach kahi nyari hoti........
Kharatar Khedegawat maza shikshan zalya mule yala ek veglach feel aahe.......
Aamhi khup maja keli ( aani Abhyas pan... Pasiingpurta ), khup hindlo, navnavin thikana pahili.

Zuza lekh wachla aani parat Flashback madye jaun aalo.Sagal kasa kaal chich ghost wateya....
Ayushyatle SUVARNA KSHAN parat parat aathavale......

Thankx.....

Yogesh Bharati

I like it.
first few lines are too good.

कधी कधी असंच एकांतात बसलं तर ...
'मन अचानक मागच्या आठवणीत हरवु लागतं,
वर्तमानातल्या विचारांची तंद्री तूटते,
आणि ते भूतकाळातच रमू लागते'.

ते दिवस आठवले की 'त्या क्षणांपुरत' तरी मन खऱ्या अर्थाने खूष होतं, आणि नाजुकशी हास्याची झुळूक ओठांवर तरळून जाते ... ते ओठ ज्यांनी वर्तमानातल्या खस्ता खावून स्वत:ला आजवर संकुचित ठेवलं होतं.

ते दिवस खरंच काही औरच होते! 'शाळेतले ते दिवस' ज्या दिवसात आयुष्य फक्त एका विशिष्ट टप्प्यापुरतच स्तिमित होतं. 'घर - अभ्यास, असतील नसतील तितका मित्र - परिवार (मग तो आपल्या पुरताच भले मोजकाच का असेना) ... आणि आपण. हेच ते टप्पे. यातच सर्व आयुष्य बांधलं गेलेलं असायचं, सर्व विश्वं सामावलेलं असायचं. शाळेचे दिवस आठवले की, आठवतो तो हर एक दिवस... 'ते पहाटेचं सकाळी लवकर उठून भरा-भर तयारीला लागणं, पहाटेच्या त्या प्रसन्न वातावरणात मन काही वेगळीच प्रसन्नता अनुभवायचं.

सकाळ - सकाळ आंघोळ, चहा-पाणी, नाश्ता आटपून भर-भर पावलं शाळेच्या दिशेने चालायला लागायची; त्यातही जर मौसम थंडीचा असेल तर शाळेत जायची मजा नाम-निराळीच! त्या कडाक्याच्या थंडीतही स्वेटर कधी मला आठवतंच नाही मी घातलेलं, सकाळ - सकाळ त्या बोचऱ्या थंडीत कडकडून आणि दात वाजवत - वाजवत, दोन हातांची घट्ट घडी घालून (इतपत की केवळ तेवढीच काय ती उब), पावलांना भर-भर ओढायचे शाळेच्या वाटेने ... खूप वेगळाच अनुभव होता तो ... त्यातही शाळेत पोहोचताच राष्ट्रगीताचा पहिला-वहिला मान, अंगाला गुलाबी थंडी बोचत असतानाही ते स्तब्ध उभे राहण्याचे तत्व सर्वांना पाळायलाच लागते, मग 'या कुंदे तुषार हार, धवला ...' अशी सरस्वतीची प्रार्थना करून सुरु व्हायचा शाळेचा हर एक नविन दिवस.

शाळेच्या दिवसांमध्ये निदान माझ्या बाबतीत तरी अभ्यासात इतका seriousness होता, इतकं अभ्यासाने झपाटलेलं  होतं कि बास! आजही माझा शाळेतला अभ्यास आठवला की विश्वासच बसत नाही की मी खरंच! अभ्यास इतका केला होता का? कारण आजची, म्हणजे आताची कॉलेज life ची अभ्यासाची परिस्थिती विचाराल तर मला स्वत:ला लाज वाटेल (प्रामाणिकपणे) इतपत बेकार आहे. म्हणूनच त्या दिवसाचं खूपच आश्चर्य वाटतं. हो! पण या गोष्टीला एक कारण नक्कीच जबाबदार आहे. ते म्हणजे 'त्या' आणि 'या' वेळचं आमचं 'विश्वं'! होय ...

असं यापूर्वी सांगितलं; त्यावेळचं आमचं (माझं) विश्व फक्त आणि फक्त घर - अभ्यास - शाळा इतपतच सामावलेलं पण ... आज तेच विश्व बऱ्याच टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. जसं ... 'माझं घर, माझा मित्र - परिवार (अर्थातच मोठा) कारण कितीही म्हटलं तरी कॉलेज life ही शेवटी अधुरीच त्याच्या शिवाय म्हणून; मग आमचा इतर extra activities म्हणजे मित्र - परिवार मोठा मग activities नकोत का वाढायला? उदा. नव-नविन ठिकाणी मित्र - मैत्रिणीसोबत हिंडायला जाणे, त्यांच्या मस्तीत स्वत:ला हरवणे, याची त्याची टेर खेचणे, मौज मजा करणं, आणि बरंच काही ... माझ्या शब्दांत ती मजा मावणार नाही ... त्यानंतर माझ्या सारख्यांचा जॉब (side by side) आणि त्यानंतर शेवटी राहिला तो फक्त 'अभ्यास'. तो ही seriousally  तर बिलकूल न केलेला (rather कॉलेज life  मध्ये करावासाही न वाटलेला) असं हे आमचं कॉलेज विश्वं दुभागलेलं, विभागलेलं अगदीच म्हणाल तर अफाट विस्फारलेल ... असो ...

मग शाळेतील अभ्यासाचा, त्या मार्क्सचा कॉलेजे मधील अभ्यास आणि मार्क्सशी काही मेळ साधेल का? नक्कीच नाही! कारण शाळेतली अभ्यासाची  प्रगती म्हणजे उत्तम न्हवे अति - उत्तम! (निदान माझ्या बाबतीत तरी). त्या शाळेच्या दिवसात तर स्पर्धा लागायच्या, compititions चालायची मित्र -मैत्रिणीसोबत अभ्यासाला घेऊन. कुणाचे मार्क्स किती चांगले असतील, कुणी किती मार्क्सने पुढे जातील? यात तर अक्षरक्ष: जीवतोड स्पर्धा लागायची, त्यातल्या त्या स्पर्धेतच जेव्हा विजयी व्हायचो  ना बास! असे वाटायचे जिंकले सर्व काही ... तो आनंद अवर्णनीयच!

पण ... आजची अभ्यासाची प्रगती? ... प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर .... आमचा अभ्यासच मुळात पेपरच्या एक दिवसापूर्वी सुरु होतो कॉलेज कुमार - कुमारीकांनाच माझे म्हणणे शब्दश: पटेल कारण शेवटी same experience चे बोल दुसरे काय! मग असा हा अभ्यास परीक्षेच्या एका दिवसापूर्वी सुरु केलेला मग कसल्या competitions आणि कसल्या स्पर्धा? त्यातही वेळ आमचा पेपरच्या अखेरच्या दिवसांपर्यंत notes शोधण्यातच जातो. मग वाचणं, अभ्यास करणं, ते शाळेत करायचो तसं घोकंपट्टी करणं तर दूरच ... tension मुले जे वाचायचो ते ही नुसतंच डोक्यावरून जायचं ... मग काय मार्क्स मिळणार? शाळेप्रमाणे 'तुझे जास्त का माझे कमी' हा वाद सोडाच पण passing पुरते भेटले तरी बास! tention नाही.

अशी आमची अवस्था ... नव्हे दुरावस्था! अशी ही अभ्यासाची प्रगती ... खरंच किती जमीन अस्मानाचा फरक आहे school life आणि college life मध्ये हे अश्या वेळी जाणवायला लागतं ...

शेवटी college life लाही दोष देऊन उपयोग नाही कारण कुणीतरी सांगून ठेवलंय ... "colleage चे दिवस हे सोनेरी दिवस असतात!" मग आम्ही या सोनेरी दिवसातलं सोनं भर-भरून जगलो तर काय हरकत आहे?

school life, college life याचं comparision खरंच जर मी छोटया छोटया मुद्यांवरून करायचं म्हटलं तर ते अशक्यच ... पण सर्वात मुख्य म्हणजे   shcool life मध्ये असताना जे आयुष्य अंगवळणी पडलं होतं ते खरंच आज कुठेतरी हरवलंय, जे हवं-हवंस वाटतंय ... कारण त्यावेळी आयुष्यच किती क्षुल्लक आणि लहानगं वाटायचं, त्यावेळी संकटं म्हणजे परीक्षा वाटायची आणि कमी-जास्त मार्क्स किंवा नापास होणं म्हणजे आयुष्यातील चढ-उतार! आज हे आठवतं तेव्हा स्वत:चेच स्वत:ला हसु येते ... आणि मन ही त्यावेळी किती संकुचित असायचे नाती, नात्यातील बंध, विश्वास, प्रेम, विश्वासघात, मन दुखावणं हे प्रकार, या गोष्टी मनाला कधी त्या काळात स्पर्शल्या ही नाहीत ... कारण त्यावेळी केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सामावलेलं विश्व! म्हणूनच त्या विश्वाचा ... त्या आयुष्याचा आज हेवा वाटतो ... खऱ्या अर्थाने हेवा वाटतो ...

कारण आज जीवनाच्या या टप्प्यावर समजु लागलंय काय असतं आयुष्य ते ... आयुष्यातील चढ उतार काय असतात, संकट काय असतात ... म्हणूनच हे आयुष्य नकोसं वाटतं ... आणि हेवा वाटतो तो "त्या आयुष्याचा' 'भूतकाळात' हरवलेलं ते आयुष्य आठवतं खरंच किती सुखद होतं! ... पण ... आज ... आपण ते जगायचंय म्हणतानाही जगू शकत नाही ... कधी जगता येणारही नाही ... हिच एक खंत राहते ... एक खंत टोचते ... बास हीच एक खंत ... तेवढीच एक खंत!

- निर्मला बोरकर.  :) :(

ganu3693

i must say its awesome.......khup chan ani meaningfull ahe...juya athvani athavtat

nirmala.