।। विदर्भ कट्टा ।।

Started by Shraddha R. Chandangir, June 10, 2016, 11:12:31 PM

Previous topic - Next topic

Shraddha R. Chandangir

राजे रजवाडे आणि भोसल्यांची शान
भारताच्या केंद्रबींदूचा मीळाला ज्याला मान
आॅरेंज सीटी म्हणून जग ज्याला ओळखतं
असं हे आमचं नागपूर महान....
.
झर झर वाहतो इथे पाण्याचा झरा
विदर्भाचे स्वर्ग म्हणजे आमचा चिखलदरा
हीरवा शालू नेसलेले हे आमचे मेळघाट
तर अमरावती त शोभतो अंबादेवीचा थाट
.
शेगावी इथे वसते गजानन माऊली
साक्षात भोळ्या विठोबा ची सावली
अहिंसेचा धडा देण्यास महात्मा जीथे अवतरले
असे हे वर्धा जिल्ह्याचे सेवाग्राम भले
.
दुर्मिळ प्राण्यांनी सजलेले ताडोबा चे सुंदरवन
आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील आश्रम
कुष्ठरोग्यांचे झाले जीथे प्रेमाने संगोपन
असे हे वरोरा चे बाबा आमटें चे आनंदवन
.
अकरा जिल्ह्यांनी नटलेला हा विदर्भ पट्टा
वऱ्हाडी भाषेत सजलेल्या मेहेफीलींचा कट्टा
माणसाने जपलेला माणुसकीचा संदर्भ
असा हा आमचा मराठ्यांचा विदर्भ.
~ अनामिका
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]