तूच तर आहेस ........!!!

Started by विजय वाठोरे सरसमकर, June 14, 2016, 02:43:12 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

तूच तर आहेस .....

स्वप्नातही स्वप्न कुठे
झोपेतही झोप कुठे
तूच तर आहेस
तूच तर आहेस ....!! १ !!

अस काही चालावं माझा प्रवास व्हावास तू
चालनही तुझ्यापासून सुरु आणि सीमाही तू
बघ पडताळून मनास या यात असशील तूच तू
मी संशयाचे ढग असेल तर विश्वास असशील तू
माझ्यातही मी आहे कुठे
माझ्यातही मी आहे कुठे
तूच तर आहेस
तूच तर आहेस ....!! २ !!


असे काही स्वप्न दे तू झोपहि उडेल माझी
काही कारण दे अशी जी रात्र जागवेल माझी
अशी दे निशाणी काही मी फक्त तुझाच राहीन
हातात त्या रेषा दे माझ नशिबाच बदलून जाईन
ओठांवर शब्द कुठे
ओठांवर शब्द कुठे
तूच तर आहेस
तूच तर आहेस .....!! ३ !!


                  विजय वाठोरे सरसमकर
                  दि.१४/०६/२०१६
                   ९९७५५९३३५९ 

ganeshshinde