प्रेम आईचं....

Started by Gopal V. Kawaskar, June 15, 2016, 07:53:41 PM

Previous topic - Next topic

Gopal V. Kawaskar

ती फ़क्त आईच..!



सकाळी दोन धपाटे घालुन उठवते.. ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते.. ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते.. ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते.. ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते.. ती आई
परतीची आतुरतेने वाट बघत असते.. ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते.. ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण..
ती फ़क्त आईच..! ती फ़क्त आईच...!                       - गोपाल वि. कावस्कार