निदान स्वप्नात तरी ये माझ्या

Started by abhishek panchal, June 17, 2016, 12:16:45 AM

Previous topic - Next topic

abhishek panchal

दिवस सरून गेला , तरी आस तुझी आहे
खऱ्याखुऱ्या जगामध्ये , भास तुझा आहे
बस साथ हवी तुझी , मग फिकीर ना जगाची
जवळ येऊन माझ्या , आस पुरी कर मनाची

आस लावून बसलेत डोळे , उगा वाटेकडे तुझ्या
खरं खुरं जमत नाही , निदान स्वप्नात तरी ये माझ्या

गूढ त्या नजरेचं , जणू कोडं होऊन गेलंय
लपलेलं ते उत्तर , पार तुझ्यात बुडून गेलंय
तू ये जवळ आज , निदान तेच देण्यासाठी
माझ्या डोळ्यांमध्ये तुला , साठवून घेण्यासाठी

झुरतंय माझं मन , नुसतं आठवणीतच तुझ्या
खरं खुरं जमत नाही , निदान स्वप्नात तरी ये माझ्या

प्रेमाचे ते वारे , पार तुफान होऊन गेलय
सरळमार्गी वाटेला , त्याने दिशाहीन केलय
भरकटलेला मी , तुझी वाट शोधत आहे
देवाकडे रोज , आता तुलाच मागत आहे

मग झुरत ठेवून मला , अशी पाहू नकोस मजा
खरं खुरं जमत नाही , निदान स्वप्नात तरी ये माझ्या

भेटीसाठी तुझ्या , ते नभ वेडे झालेत
वाट बघता बघता , पार थोडे थोडे झालेत
दुखावलेले नभ , माझ्या डोळ्यातून बरसतायत
आस ठेवून वेडी , तुझ्या येण्यासाठी तरसतायत

ते नभ निर्दोष आहेत , मग त्यांना का देतेस सजा
खरं खुरं जमत नाही , निदान स्वप्नात तरी ये माझ्या

वेळ नसेल तर , वेळ काढून तू ये
जगाचे ते भेद , सारे तोडून तू ये
कमी असेल मी , तर पूर्ण करण्यासाठी ये
नेहमीच जिंकलीस तू , आज हरण्यासाठी ये
रोखत असेल पाश , त्याला मोडून तू ये
खोटं नाटं जग , आज सोडून तू ये
आठवण असेल माझी , निदान ती घेण्यासाठी ये
झोप हरवलेल्याला , झोप देण्यासाठी ये

तुला भेटण्याचा , आता नाही दुवा दुजा
खरं खुरं जमत नाही , निदान स्वप्नात तरी ये माझ्या

   अभिषेक पांचाळ
            पुणे

Shri_Mech

आपल्या शेवटच्या कडव्यासाठी...

आना, जब समय मिले
जब समय न मिले तब भी

आना दिनों को चीरते-फाड़ते
और वादों की धज्जियाँ उड़ाते हुए

- केदारनाथ सिंह
Shri_Mech