शाळेतलं पिरम....!!!( भाग-३)

Started by Ravi Padekar, June 17, 2016, 07:22:57 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

 सोनलचं नेहमी येण-जाण होत  दिगंबरच्या घरी...... तस दोघेही एकत्रच लहानाचे मोठे झाले.....चित्रा दिगंबरची छोटी बहीण..... घरी सर्वजण तिला चिऊ बोलायचे...... ती नेहमी त्याला सोनल च्या नावाने चिडवत असत...... " ये दादा वाहिनी आली"  बोलून पळून जायची....... दिगंबरच्या मनातून पल्लवीचा विचार काही जात नव्हता ..... त्याला अजूनही डोळ्यासमोर ती भिजलेली पल्लवीचं दिसत होती, तिच्या डोळ्यावरून येणारे पाणी, ते भिजलेले केस, सारे ओलेचिंब झालेले अंग.... डोळ्यासमोरून तिचा चेहरा काय हटत नव्हता..... दिगंबर बाहेर अंगणात चांदण्यांकडे पाहत असताना सोनल येते.... " का रे काय पाहतोय आभाळात ?..... सोनल
"अरे तू कव्हा आलीस ? ( खाटेवरून उठून पहिले)
" हे काय आताचं आली"
"मगं काय काम काढलय आज"
" काही नाही सहजच....काय बघतोय आभाळात "
" काय नायी गं... तुटते तारे पाहतोय...."
"हो का !!! मग काय मागितलस"
"काही नाही.... पण मागितल्यावर अस कायी मिळत का?
"अरे हो चांगल्या श्रद्धेने मागितल ना नक्कीच मिळतं "
दिगंबरने हात जोडले आणि मनोमन  पल्लवीच्याच मिळण्याची प्रार्थना केली ..... आणि विचारले तू काय मागितलस?
"अरे अस काही सांगायचं नसत "
"बरं बाबा राहिलं मगं"

   दहावीच वर्ष असल्याने आता कोणी कोणास एवढं भेटत नव्हतं..... सहामाही परीक्षा सुद्धा तोंडावर आली होती....तिच्यासाठी एक दिवसही दिगंबर शाळेत गैरहजर राहिला नव्हता......  दिगंबर हा हुशार होता पण आज काल त्याच मन लागत नव्हतं अभ्यासात..... हळू हळू दिवस पुढे सरू लागले..... सहमाही परीक्षा सुद्धा संपली..... आता दिगंबर पुढे नवीन विषय होता....शाळेतून निघालेली सहल...! पण सहलीला जायला पल्लवी तय्यार नव्हती..... म्हणून दिगंबरनेही सहलीला जायचं टाळलं..... शेवटी सोनल ने कसतरी तिला तय्यार केल.  आणि दिगंबर ने ही सहलीसाठी नाव दिल.... धम्माल मस्ती करत सर्वजण enjoy करत जात होते.....  दिगंबर ने सुरवात केली गाण्यांच्या भेंड्याची.....
                     "कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखे
                      कितनी प्यारी आंखे है, आंखोसे छलकता प्यार
                      कुदरत ने बनाया होगा फुरसत से तुझे मेरे यार.....
सर्वजण टाळ्या वाजवत त्यांना साथ देत होत.... पल्लवी ने पण त्याला नजर देत उत्तर दिल....
                      "हमारे दिलसे मत खेलो खिलोना टुट जाएगा
                       हमारे दिलसे मत खेलो खिलोना टुट जाएगा
                       जरासी ठेस पहुचेगी ये सीसा टुट जाएगा 
                       हमारे दिलसे मत खेलो खिलोना टुट जाएगा....

सर्वजण गाण्यांमध्ये बेंधुंद असताना जितुने पण त्यांच्यात एंट्री केली....
                     "दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके
                      सबको हो रही है खबर चुपके चुपके.....

बोलता बोलता असाच वेळ सरत होता कधी spot आला कळलही नाही..... सर्व जण उतरले...पल्लवी गाडीतच होती.... दिगंबर खाली उतरणार तेवढ्यात तिने म्हटलं " मस्त गातोस रे"  कधी ऐकवली नाही मला अशी गाणी.... "हो का!!!" दिगंबरने म्हटले.... ती फक्त हसली....आणि ते निघाले.....
एक एक स्पॉट पाहत पाहत ते त्यांच्या हॉटेल जवळ पोहचले.... नीरव अशी शांतता पसरली होती..... रात्रीचे रातकिड्यांचा होणारा कर्कश आवाज.... संथ वाहणारी हवा..... दिगंबरला वाटलं आताच विचारूया तिला...... ती केव्हा मुलीपासून वेगळी होते याची वाट पाहत होता...... सर्वजण झोपण्यासाठी गेले असताना हा तिच्याकडे जाण्यासाठि निघाला..... ती मात्र बाहेरच पेटत्या निखार्‍या समोर एक एक काठी टाकत शांत बसली होती....  दिगंबर तिच्याजवळ जाणार तेवढ्यात त्याला दुरूनच एक प्रसंग पाहायला मिळाला...... तो म्हणजे जितु.....
जितु तिच्याजवळ गेला होता..... तो तिच्याशी काहीतरी बोलत असताना तिने मारलेली कानाखाली दिगंबरच्या डोळ्यांनी टिपली होती..... त्याला कळलं नव्हतं नक्की काय झाल आहे..... तो तिथून निघून गेला आणि जितु आल्यावर त्याला विचारलं..... पण तो ही काही नेमकं कारण सांगत नव्हता.......         

......To  be continued