एकटा मी एकटी तू....

Started by maheshkarpe4, June 18, 2016, 05:09:27 PM

Previous topic - Next topic

maheshkarpe4

इंद्रधनुची किमया तू, प्रेमातील माया तू ;
गुलाबाची कळी तू ,गालावरची खळी तू ;
तुझा मी माझी तू, एकटा मी एकटी तू ।।

मरणाचे घाव मी, जगण्याची आस तू ;
शब्दातील शस्त्र मी, मंजुळ सुरांची वाणी तू ;
तुझा मी माझी तू , एकटा मी एकटी तू ।।

काही बोलायचे असेल तर मनातुनच बोल;
कारण तुझ्यात मी, आणि माझ्यात तू ;
तरीही एकटा मी आणि एकटी तू ।।