काळजी....

Started by maheshkarpe4, June 19, 2016, 12:16:04 AM

Previous topic - Next topic

maheshkarpe4

कोणाच्याही चेहर्यावर हास्य उगाच येत नाही;
तुझा विचार केल्याशिवाय दिवस माझा जात नाही।
काळजी वाटते तुझी या काळोखाच्या जगात,
धड तुला मनमोकळ हस्ता ही येत नाही।।

ज्या निरागस चेहर्यावर हास्य दिसायला हवं
त्या डोळ्यांतच पाणी दिसायला लागलंय...
दुष्काळाच्या काळात ही ओसंडून वाहायला लागलंय।।।
किती क्रूर झालय हे जग!!!
वाघनख्याहून जास्त काळजात रुतायला लागलंय।।

पावसात रडणार्याचे म्हणतात अश्रुही दिसत नाही।।
हे जग असं झालंय की देवालाही भीत नाही।

पण नुसतं ऐकत बसून/सहन करून चालणार नाही...
लढा तर द्यायलाच हवा...
विजय तर व्हायलाच हवा....
काळोखाच्या ह्या जगात प्रकाश आता पडायलाच हवा...

माणसा सारखे रहा जनावर बनू नका....
गुलाबाचं नाव घेवून काटा उगाच टोचू नका!!!

कवी :- महेश
शीर्षक सुचवा।।