आला पाऊस

Started by neelr, June 19, 2016, 10:07:14 AM

Previous topic - Next topic

neelr



आला पाऊस, दूर नको जाऊस
अंतरातही अंतर नको ठेवुस

थेंबांची मखमली शाल पांघरून बिलग
सणाणून जाऊ दे वीज दोघांमधून सलग

तोड आज सारेच बंध
बहक बनून अदृश्य मृदुगंध

गुज पावसाचे सांग कानात
नाते तुझे माझे पावसाचे जप मनातल्या मनात