सभ्य

Started by neelr, June 19, 2016, 10:24:44 AM

Previous topic - Next topic

neelr



सभ्यतेची भाषा करतो हा गंभीर किनारा
लहरी लाटा मात्र करतात वेगळाच इशारा

सभ्यतेचा मुखवटा आहे प्रत्येक चेहऱ्यावर
हजारो ओरखडे आहेत हसऱ्या मनावर

महागडी स्वच्छ वस्त्रे आहेत आज सभ्यतेचा आरसा
मन कटू का असेना फरक पडत नाही फारसा

सभ्यतेला ठेवावे लागते शेवटी तारण
आरोपातून सुटण्यास तेच उपयोगी पडते कारण

पैशाने मोजून मापून घेता येते स्वच्छ सभ्यता
पैसा नसेल तर अनुभवी फक्त विवशता

बहुतेक दगड १०० टक्के सभ्य असावा
उगाच का मग त्यात देव दिसावा

Swati ay