तुझे भिजणे

Started by गणेश म. तायडे, June 19, 2016, 05:03:24 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

तुझे पावसातले भिजणे
गालांवरी थेंब ओघळणे
केसांच्या कोसळती सरी
ढग गरजती तुझ्या तालांवरी
डोळे तुझे मोहक पाणावलेले
पावसाला पापण्यात झेलणारे
भिजूनी गेले तुझे अंग सारे
अंगावरी माझ्या उठती शहारे
पेट घेतला देहाने तुझ्या
राख माझ्या भावनांची होई
रिमझिम पावसाच्या सरी
बनूनी कोसळावे तुझ्यावरी
मिठीत घेऊनी तु न्हाऊनी निघावे
श्रुंगार यौवनाचा बहरून जावे

- गणेश म. तायडे,
    खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com