दासी आणि अर्धयोगी

Started by SunilShinde, June 19, 2016, 07:51:08 PM

Previous topic - Next topic

SunilShinde

दूरच्या राऊळात एक उदास दासी
सेंद्रीय जगण्याचे शिंतोडे भांगांवर
सप्तवेदीआधी जणु गढुळली बारव
कुंतीचा शरीरधर्मच तो अंगांगांवर

अस्तित्व उधळले अस्तित्वा अर्थ देण्या
निस्वार्थ निसंग जगणे प्रारब्धी आले
निमुट सगळे साहले शापितेने
ऐश्वर्याची तहान शमेना भोगांवर

कलंकच तो योगी हतबल ओरडला
तार्यांचे गीत गावे कुणासवे कसे
तपश्चर्या ढळली..स्वर्ग ना अवनी
शुष्क भरार्या भेटींच्या जागांवर

यावत् जिवेत सुखम् जिवेत
मानते परी ती धुक्यात हरवली
विस्कटला केशसंभार कुणास्तव
मोक्षवेल वाढेल फक्त वेदांगांवर

गाभुळल्या घराला सृजनाचे डोहाळे
सोवळे अंग कुणाचे सांगावे कुणी
सखा-सखीच राहू सांगावा अर्धयोग्याचा
अनंत वाटा तरी भूत मागांवर

- - सुनिल शिंदे