सूर मनाचे

Started by Vedanti, June 22, 2016, 05:29:59 PM

Previous topic - Next topic

Vedanti


कधी उमगले, कधी विसरले,
मन हे मनाशीच गुंथले...

कधी रुसले, कधी बहरले,
मनाने मनालाच फुलवले...

झाले कधी अस्थिर,
तर कधी स्थिरावले,
मनाने मनालाच सावरले...

झाले कधी अधीर,
तर कधी धिरावले,
मनाने मनालाच आवरले...

झाले कधी किमयेचा सागर,
तर कधी वाटले-
मनाने मनाचेच सूर अनुभवले...

-वेदांती
http://vedantiagale.blogspot.com
[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]