मी न उरलो माझ्यात.

Started by Dnyaneshwar Musale, June 23, 2016, 01:38:49 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

मी न उरलो माझ्यात
जिव गुंतलाय तुझ्यात,
कोरीत असे एक एका अंतऱ्यात
बरसावे तु तुझंपरी हिरमुसणाऱ्या हृदयात.


रुप साजरी मनात घुसली
चिंब पावसात हृदयात ठसली
चतुर चांदणी रंग गोजीरा ,
फुलशी मनात तु गुलमोहरा.

बिलगुन पाकळी फुलात बसली
उमलता हळुवार गालात हसली,
अबोलीचा सुंगधीत दरवळशी पिसारा
प्रेमात पडतो न्याहाळुन तुझं एक चंद्रतारा.

खळखळुन हसता एक खळी ती दिसली
लपंडाव सोड आता तु इंद्रधनुत लपली,
बहरावे अंगणी येउनी प्राजक्त हसरा
गुंफावे धाग्यात क्षण लाजरी नखरा.

सरळ साधे असे हे एक नाते
प्रेम वाहता अंतरातले कवडसे उलगडत जाते,
तुझ परी मी न माझ्यात असा उरलो
शोधण्यास ती कळी मी पुन्हा विखुरलो.