माझं प्रेम

Started by Gopal V. Kawaskar, June 24, 2016, 09:36:06 AM

Previous topic - Next topic

Gopal V. Kawaskar

नको होतो ना मी तुला,
मग तसं मला सांगायच होतं.....

कारण

तुझं माझ्यावर नसलं तरी,
माझं तुझ्यावर खुप प्रेम होतं.....

वेड्यासारखा नकळत न सांगता,
प्रेम करत होतो मी तुझ्यावर.....

जे तुला कळून ही,
कधीच कळल नव्हतं.....

मी तुझा कोण लागत नाही,
हे अगोदरच मला समजलं होतं.....

तरीही माझा मुर्खपणाच अडला मला,
एकतर्फी माझं तुझ्यावर प्रेम झालं होतं.....

कारण

मला एकदातरी समजुन घेणं,
तुला कधीच जमलं नव्हतं.....

पण

तुच सांग ना काय करु मी,
कायमच विसरायला तुला.....

जेव्हा जेव्हा विसरायच,
ठरवलं मी तुला.....

तेव्हा तेव्हा तुझं नाव,
आपोआप माझ्या ओठांवर येतं.....

तुला विसरायचे बहाणे,
फेल ठरले माझे सारे.....

नाही कळल्या तुला माझ्या भावना तरीही,
माझं तुझ्यावर खुप प्रेम होतं.....