लग्न...!

Started by Rajesh khakre, June 27, 2016, 06:33:52 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

लग्न..!

लग्न ही एक गोष्ट आयुष्यात ख़ास असते
होईपर्यन्त मनाला खुप खुप आस असते

आयुष्यात कुणाची हवी असते साथ
म्हणूनच लग्नाची बांधली जाते गाठ
सोबत चालायला हवंय ना कुणीतरी
डोळ्यातल्या अश्रुंना पुसणारं कुणी

खुप स्वप्न डोळ्यांत भरगच्च भरलेली
भव्य भव्य मनोरे त्यावर उभारलेली
जगण्याची सर्व गणित मांडून ठेवलेली
मनाच्या इवल्या कुपीत अलगद जपलेली

भेटला जोड़ीदार चांगला मग असते बात
नाहीतर आयुष्याचा अकाली होतो घात
कोलमडून जाते मन अन अवेळीच् सुकते
जीवनाच्या मध्यान्ही मग अंधारुन जाते

कोसळतात मनोरे सर्व एक एक करत
मंतरलेल्या मनाला मग सालटे नाही राहतं
सर्व वेदना झेलत मग मन बधीर होतं
कुठून आपण कुठे आलो हे शोधत राहतं

तेव्हा उगवनारा सूर्यही आपला असत नाही
पाढा आपला हा रोजचा कुणीही ऐकत नाही
अपराधी जीवन आपलं मन कुढत बसतं
नाशिबाच्या नावाने खड़े फोडत राहतं

कोण चूक कोण बरोबर गणित सुटत नाही
रोज रोज मन मात्र तीळ तीळ तुटत राही
कुणाच्या दरबारात मग मागावा तो न्याय
कोण आपल्या मनो वेदना जाणनारा हाय

सत्याला त्या येथे वालीही कुणी नसतो
जीवनाच्या या चक्रव्यूहात मग पुरे फसतो
कधी अभिमन्यु होईल हे सांगता येत नाही
वाचलेच चुकून तरी ते जगणे म्हणत नाही

अशी ही लग्नाची एक दूसरी बाजू असते
साथ शोधता शोधता घात करुन जाते
उध्वस्त आयुष्याची होळीच जणु असते
दिवाळीच्या उजेडात मात्र ती झाकाळून जाते
🏻©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com