यावर्षी तरी...

Started by Pravin Raghunath Kale, June 27, 2016, 01:35:47 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale


भरून येईल ना आभाळ
तेव्हा मला आठवण्याचा प्रयत्न कर
मनात नसलं तरीसुद्धा
माझ्यासाठी पावसामध्ये हात धर

हातावरच्या इवल्याशा तळ्यात
पावसाचे थेंब दोन थेंब साठव
मनाची इच्छा नसली तरीसुद्धा
आपला एकत्र पाऊस आठव

हातात हात घालून, आपण
सोबत मनामध्ये साठवलेला पाऊस
नव्याने पुन्हा जागा कर
दोघांनी एकाच कपात पिलेला चहा आठव
तो आठवला की एकटीनेच मग
चहा पिण्याचा प्रयत्न कर

तेव्हा भरून आलेल्या आभाळासोबत
तुझे डोळेही भरून येतील
मग भरून आलेल्या डोळ्यातील अश्रू
हाताने पूसण्याचा प्रयत्न तू करशील

नकोस करू, पावसाच्या थेंबासोबत
अश्रूही सहज वाहून जातील
वाहूदे त्यांना पावसोबत
मनसोक्त रडून घे, पावसाबरोबर
वाटलंच तुझ्या मनाला, तर
मन दाटून आल्यानंतरही
मला विसरण्याचा प्रयत्न कर

जमणार नाही तुला हे सारं
मला अजूनही जमलेलं नाही
ढग दाटून आल्यावर तूझी
आठवण मनातून जात नाही

याही वर्षी पून्हा पाऊस येईल
तुझ्या आठवणी नव्याने जाग्या होतील
सभोवतालचा पाऊस मग
डोळ्यातही अश्रू दाटून येतील

अश्रूभरल्या डोळ्यांनी तरी मग
मनाच्या कोपऱ्यात हरवलेला
नंबर आठवून एखादा
काॅल करण्याचा प्रयत्न कर
यावर्षी तरी आभाळ दाटून आलं की
मला आठवण्याचा प्रयत्न कर...

यावर्षी तरी आभाळ दाटून आलं की
मला आठवण्याचा प्रयत्न कर...

प्रविण रघुनाथ काळे
Mo. 8308793007
visit & like my FB page : www.facebook.com/kalepravinr