बदल

Started by रेनी, June 28, 2016, 01:36:38 PM

Previous topic - Next topic

रेनी



हा ही काळ जाईल ओसरून
उन्हा नंतर सावली जाईल पसरून

नात्यांना नको ठेवूस मुठीत पकडून
जायचे तेव्हा ते जातील सत्य नीट समजवून

वादळाने घर ठेवले उध्वस्त करुन
पण जाताना एक ठेवले अंगण सावरुन

सारेच रंग क्षणात दिव्यागत गेले उजळुन
प्रेमाच्या रंगात जेव्हा कायम ठेवले स्वतःला बुडवून

तू चांगला की मी वाईट हा प्रश्न नव्हता कधी आला उफाळुन
आपले विचार कधीच नाही आले एक दिशेत उजळून