पहिली भेट

Started by Ratndeep, June 29, 2016, 05:29:33 AM

Previous topic - Next topic

Ratndeep

माझी ****,
मला काही गोष्टी आठवत आहे ते मी तुला थोडक्यात सांगायचा प्रयन्त करेन,
1) *पहिली भेट*
जेव्हा तु मला भेटायला आलीस खूप घाबरली होतीस, तेव्हाच समजलं तुझ्या आई चा किती बारीक लक्ष आहे  तुझ्यावर, तू मला विचारले कि आईचा वाढदिवस आहे कोणता केक घेऊ,,मी म्हणालो कोणता पण घे, तू म्हणालीस आईला मँगो केक आवडतो आणि तू तोच ऑर्डर केलास, आभारी आहे पहिल्या भेटीत तू मला निवड करण्याची संधी दिलीस, तू माझ्यासाठी पेस्ट्री ऑर्डर दिलीस, पण तू न खाता मला पूर्ण संपवायला सांगितली, आणि पहिल्यांदा मी तुझा ऐकलं आणि पूर्ण खाली, मी म्हणालो बस खाली पण तू एवढी घाबरलेली होतीस कि जणू तुझी आई तिथे येणार आहे, मग तू मला लगेच टाटा करून गेलीस,मला माहित होता तुला खूप वाईट वाटलं,म्हणून तू पोहोचल्या बरोबर मला टेक्स्ट मेसेज केलास कि सॉरी मला खूप भीती वाटत होती,तू मला नेहमी म्हणयाचीस कि तु फॉर्मल मध्ये खूप छान दिसतो म्हणून मी फॉर्मल मध्ये आलो होतो आणि मला आज हि आठवते तू चॉकलेटि पंजाबी ड्रेस मध्ये अली होतीस खूप छान आणि सोजवळ वाटायचीस  हि गोष्ट मला आज पण आठवते आणि आठवत राहीन आपली पहिली भेट, थँक्स फॉर कमिंग,