बाबांची आठवण...

Started by maheshkarpe4, June 29, 2016, 08:48:46 AM

Previous topic - Next topic

maheshkarpe4

                   बाबांची आठवण!!!

इवल्या इवल्या पावलांनी घरी आलीस तू।।
बघता बघता जमिनीवर रांगू लागलीस तू।।

तुझ्या सोबत खेळताना खूप आनंद वाटायचा ;
पण बघ ना!! तुझा हा बाबा कामावरून उशिरा घरी यायचा।।

वर्षा-दिड वर्षातच तू चालायला लागलीस ;
तोंडानी थोडं-थोडं बोलायला लागलीस।।
एवढ्या एवढ्या गोष्टींवरून रुसुन तू बसायची ;
चोकलेट आलं पुढे तर कशी गोड तू हसायची ।।

कधी मोठी झालीस कळलंच नाही ;
तू घरी असतांना कामाकडे लक्ष कधी लागलच नाही ।।
तुला खूप शिकवायचं हा ध्यास होता मनात ;
तू ही तेवढे कष्टं घेतलेस हे आहे माझ्या ध्यानात ।।

लहानपणी पाठीवर घेऊन तुला घोडा-घोडा खेळायचो ;
म्हणायचो मी तुला "तूझाही राजकुमार तुला घोड्यावर बसवून नेईल"...
पण वाटलं नव्हतं की तो आल्यावर माझे डोळे भरून येईल...

तू सासरी गेल्यावर खूप एकटं एकटं वाटायचं ;
सारखा विचार यायचा मनात..तुला पुन्हा केव्हा भेटायचं ??
बाळा...आयुष्यात तू नेहमी सुखात रहा!!!
पण कधी कधी तुझ्या ह्या बाबांची
आठवण ही काढत जा!!
आठवण ही काढत जा.....

कवि :- महेश कर्पे .

Shrikant R. Deshmane

lai bhari..
aavdli kavita..
te shabda, ti rachana.. khup chan..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

maheshkarpe4

Thank u soo much....tumche protsahan milale ki mag kavita karat rahava asa vatta...dhanyavad