प्रमोद चे शब्द...!!

Started by Balaji lakhane, June 29, 2016, 11:16:28 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

[29/06 10:24 am] कवी प्रमोद फाटे: काय गुन्हा आहे मज
का बोलत नाहीस काही
सांग मज एकटीला
का सोडून गेलीस आई

शिळे तुकडे वेचुन
ते खाऊन मी जगते
आज भेटशील उद्या भेटशील
या आशेवरती जगते ...

बघ एकदा माझ्या डोळ्यात
तूच तू दिसशील ..
माझ्या डोळ्यातील आसवांत
तू चिंब चिंब भिजशील..

मी जीवंत असूनही
मृत आहे माझी दशा
मुलगी म्हणून जन्मल्याची
आई एवढी मोठी सजा ...

मुलगा झाला म्हणल
की तुम्ही नवस जाऊन फेडता
आणि मुलगी झाली म्हणल
की कचरा पेटित जाऊन सोडता ...

कुणी नाही समजून
आम्हा पापी डोळ्यांत ठेवतात
उपाशी पोटी तुझ लेकरु
तिच्यावर बलत्कार करतात ...

जन्म देऊन तू सोडून जातेस
तुला आठवत ही नसेल काही
पण जेव्हा जेव्हा मला त्रास होतो
फक्त तूच आठवतेस आई ...

खुप दुःख सोसाव लागतय
उपाशी मला निजाव लागतय
काय सांगू आई तुला
मला कसकस जगाव लागतय...

आज एक वादा कर
बाकी बोलू नकोस काही
तुला मातृत्वाची शपथ
मला वाचव ना ग आई ...
मला वाचव ना ग आई .....

        ✍कवी
    🙏प्रमोद फाटे🌷

मु.पो.गार्डी ता.पंढरपूर
  9566024008

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

sneha31