*** प्रिये, थांबव ना ग हे आता ***

Started by Shri_Mech, June 29, 2016, 06:18:35 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

*** प्रिये, थांबव ना ग हे आता ***

तू गेल्यापासून,

जीव लागेना जगण्यात
पाणी थांबेना डोळ्यात
चित्त नाही ताब्यात
याला गुंतवावे तरी कशात


सुकला तो चाफा वाट पाहून
निजल्या त्या चांदण्या थकून
परतली आशा वाटेवरून
गेले ते पक्षी उडून


प्रेम भावना कोमेजली
उत्साह निपचित पडला
आनंद परत ना फिरकला
जगण्याचा बेतच बिघडला


पसरली सर्वत्र आमावस्या
निराशल्या या दशदिशा
व्यथा या सांगाव्या कशा
गेलीस तू कोणत्या देशा


अवकळा ही दाटून आली
दुःछाया स्वप्नांवर पडली
स्थैर्याने पण साथ सोडली
अवदसा ही अशी प्रकटली


वादळाने हे मन उद्ध्वस्तले
अपेक्षांची झाली अनंत शकले
प्रयत्नात सगळ्या अपयश भरले
नियतीचे घाव वर्मी बसले


प्रिये, थांबव ना या सगळ्याला
माघारी पाठव ना तुझ्या रुसव्याला
घेऊन ये ना त्या स्मितहास्याला
ये ना ग पुन्हा मला सुखी करायला

Shri_Mech
Shri_Mech