अक्षरशः अर्ध्याश्वासावरती

Started by Ekraje, June 29, 2016, 10:04:26 PM

Previous topic - Next topic

Ekraje

अक्षरशः अर्ध्याश्वासावरती तास हा काढिला
येशील कव मोहिने तु अहा वेळ बहू जाहला

स्पंदने हृदयाची न जाती मोजल्या
अधीर मन, वृत्ती साऱ्या सजल्या
हुलकावणी ही बहू दूर काळाची आहे
अन् त्यात शब्द तू का मघाशीच् दिला .......
येशील कव मोहिने तु अहा वेळ बहू जाहला

की देऊ साद तुज पुन्हा कोडे हे पडले
नसत्या वाक्ति बहू चकरा आता काय अडले
आधीच निराश त्यात न जाओ मी परतुनी
बसलो सकाळीचा आता सूर्य डोक्यावरी आला
येशील कव मोहिने तु अहा वेळ बहू जाहला

अग काय हे गप्पा दुसरिकडेच रंगल्या
स्मृती तुझ्या आशा माझ्या भंगल्या
स्वप्नांंशी बेरंग करणे नवीन नाही
तरी उगीच मी जीव होता तुजपाशी ठेवला......
येशील कव मोहिने तु अहा वेळ बहू जाहला

Ekraje

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]