सहवास

Started by रेनी, June 30, 2016, 11:15:43 AM

Previous topic - Next topic

रेनी

आयुष्याला दे, एक खास कारण जगण्यासाठी
तू आहेस तसे निमित्त मरण्यासाठी

माहीत आहे, नाही देणार तू नकार
होकारा सोबत असतील तुझ्या रुसण्याचे हजार वार

रोज माझा चेहरा दिसतो
पण तुझ्या चेहऱ्यावर अनोळखी शाप असतो

येईल ध्येयहीन आयुष्याला गहिरेपणा
तुझा खोटेपणा देऊन जाईल जगण्याला शहाणपणा

तू निघून जाताच मोगऱ्याचा येतो सुवास
आभासात कोण देतो माझ्या एकांताला सहवास







Shrikant R. Deshmane

तू निघून जाताच मोगऱ्याचा येतो सुवास
आभासात कोण देतो माझ्या एकांताला सहवास  :(

masta..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]