नाते

Started by रेनी, June 30, 2016, 12:34:45 PM

Previous topic - Next topic

रेनी

काल  रात्री दुःख गेले होते निरोप देऊन
सकाळी पायाशी बसले होते पुन्हा जुन्या नात्याची शपथ देऊन

किती हट्ट पुरवले, समजावले पण ते नाही जात
माझ्यावर आणि सुखांवर शेवटी ते करते मात

खूप निरोप पाठवल्यावर सुख आलेय भेटायला
क्षणिक असतात नाती ह्यावर लागलेय ते जास्त बोलायला

किती समजावले पण सुखही नाही समझत
उद्या येईन सांगून लागते गोल गोल फिरवत

नाते माझे कुणाशी, दुःखाशी की सुखाशी
जे  ह्या क्षणी आयुष्य जगेल त्या नात्याशी

sneha31