प्रेम

Started by Kunte mahadev, June 30, 2016, 10:09:46 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

कशाला हे मन कुणाच्या प्रेमात पडतं,
तू प्रेमात पडलास आपल्याला का सांगत,
कशाला कुणाच्या आठवणीन रात्र रात्र जागत,
कुणी भेटलं नाही तर अश्रू का गाळत,
कशाला कुणाला भेटायला मन इतकं तडफडत,
भेटून गेल्यावरही भेटीसाठी का तळमळत,
कशाला कुणासाठी मन क्षण क्षण झुरत,
रात्रंदिवस विचार करून या जीवाला छळत,
कां इतकं कुणी मनास आवडून जात,
रंगेबिरंगी स्वप्नांना मनात पेरून जात,
हे माझं प्रेम मनाला कसं कळत,
कां आतला आवाज ऐकून मन वेड होत,
काही कां असे नां काहीतरी असं घडतं,
हेचं आपलं प्रेम
आपल्याला कळून जात......✍ कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

Kunte mahadev

तू सोबत होतीस म्हणून..!!
मला एकटे कधीच वाटलं नाही
तू सोबत होतीस म्हणून दू:खात कधी भिजलो नाही
दूर वादळे दिसताना  मी घाबरलो नाही
त्यास कधी सापडलो नाही
तू सोबत होतीस म्हणून....!! आयूष्याच्या वाटेत मी कधी डगमगलो नाही
एकटयाचे जिवन होते न कूणी सोबत होते
न कूणी ओळखीचे तू भेटलीस
अन....
ओळख मज मिळाली
नव्या जिवनाची पहाट मज मिळाली
तू सोबत होतीस म्हणून..!!
चांदण्यांना पाहताना  वाटायचे
माझेही कूणी असावे
लाख चांदण्या आहेत येथे
मग मलाच का एकटेपण मिळावे..
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

Kunte mahadev

ओंजळीतले क्षण केवळ प्रेमाचे होते
नकळत आवड्लेलीस तू माझे मलाच कळले नव्हते..
माळले प्रत्येक फुल सुगंध मलाच देत होते
शेअर केले सारे क्षण फक्त प्रेमानेच भारले होते..
डोळ्यात पाणी तुझ्या मन माझे रडत होते
हसलीस जेव्हा तू सारे जीवन हसले होते..
अवचित आवडलेली तू जीवन एक स्वप्नः होते
रात राणी कधी बहरली माझे मलाच कळले नव्हतं.  कवी~महादेव कुंटे मो.9075197777

Kunte mahadev

सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला
वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला
माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
कवी ~महादेव कुंटे मो.9075197777


[

Kunte mahadev

सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला
वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला
माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

Kunte mahadev

ओंठ जरी माझे मिटलेले
डोळे मात्र उघडे होते
तू ओंठातून फुटणार्या
शब्दांची वाट पहिली
पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते
कवी~महादेव कुंटे मो, 9075197777

Kunte mahadev

♥♥♥♥♥♥♥♥
कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
कवी~महादेव कुंटे मो,9075197777