फरार

Started by रेनी, July 02, 2016, 07:50:20 PM

Previous topic - Next topic

रेनी

पुन्हा फरार, कुणीतरी तोडून नात्याचा करार
जखम होती ओली तरी घातला पुन्हा  वार

नाही आज अमावास्येची रात्र
चंद्र खेळतोय तरी लपंडावाचे सत्र

हिंदोळ्यावर घेत होतो मजेत झोका
वारा का देतोय  निष्कारण मधेच धोका

फुलांचा रंग, गंध आज कुठे पसार
तुझ्या अनुपस्थित हरवली बहार 

कुणाला आवडते इथे  बंधनात राहायला
रात्र होताच  सावली जाते अंधाराशी नाते जोडायला

देव्हाऱ्यात आज देव नाही दिसला
खरा भक्त शोधाया तोही आज बाहेर पडला

आज श्वास होतोय विचलित फार
कुणीतरी आठवण देऊन झालेय फरार