असाच बरसत जा

Started by Dnyaneshwar Musale, July 02, 2016, 08:59:31 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

रिम झिम धारा
पाऊस वारा
जुळ जुळ पाणी
किलबिल गाणी
छेदुन गेली मनाला
उघडुन कडी
जग दिसे  कणाला,
गंध वेलीचा हसरा
रानोरान फुलकळ्या  पसरा
रंग भरून दाटे ही हिरवळ
झगमगणाऱ्या रातकिड्यांची दरवळ
डोंगर दऱ्या माळरान
बहरून आलंय छान,
पाऊल वाटा
झाल्या खोट्या
बिचकवुन टाकती
या मनाला छोट्या,
झाकळलेले ढग
लागले हे बरसु
असच बरसत जा
नको आम्हा
पुन्हा तरसु,
करू नको
आमची इवलीशी
ती खोड
असाच बरसत रहा
राग रुसवा तु सोड.