ग्रह तारे

Started by sneha kukade, July 04, 2016, 12:55:46 AM

Previous topic - Next topic

sneha kukade

जीवन एकदाच मिळत
खरच का ते ग्रहांत फिरत ???

जीवनाचे सुर माणसाने
गवसवे मग का नशीब
ग्रहानि ठरवावे ?

कुणी म्हणे शनिची
साडेसाती करी जीवनाची माती !
कधी राहूची दशा करी दुर प्रयत्नांची
आशा !

कुणी म्हणे शुक्र नाही हाती
म्हणुन प्रेम नाही साथी !

कुणी म्हणे तूला आहे मंगल
होईल तुझा लग्नात दंगल

कुणी म्हणे चंद्र नाही साक्षी
म्हणून भेटणार नाही सौ-साक्षी

कुणी म्हणे प्रबळ नाही सुर्य
म्हणुन तूझात नाही शौर्य !

का कुणी अस म्हणावं
ईष्ट अनिष्ट म्हणुन त्या ग्रहांना ही
दुःखवाव !!

का कुणी त्या ग्रहात माणूस
शोधाव
शोधायच तर माणसात मन
का नाही शोधाव !!

wrt.:sneh@

Bilander

जीवन एकदाच मिळते
मग का ग्रहांभोवती फिरते

जीवनाचे सूर माणसे गवसतात
मग नशिबाला शोधात ग्रहांमागे का फिरतात

कुणी म्हणे शनीची साडेसाती करे जीवनाची माती
राहू बंद करतो नशिबाची खाती

कुणी म्हणे शुक्र नाही माथ्यावर
प्रेम नाही तळहाताच्या रेषेवर

कुणी म्हणे तुला आहे मंगल
लग्नात होईल नात्याची दंगल

कुणी म्हणे चंद्र नाही साक्षीला
म्हणून भेटणार नाही तो घराच्या लक्ष्मीला

कुणी म्हणे प्रबळ नाही सूर्य
ऐकता हे सुटे सारेच धैर्य


का कुणी असे म्हणावं
सुंदर ग्रहांना परके मानावं

का ग्रहात माणुसकी, नशीब अन नाते शोधावे
ह्या क्षणात जगताना उदयाला थोडे बाजूला ठेवावे





Bilander

कवितेचा अर्थ तोच आहे पण शब्दांची रचना बदलला आहे

sneha kukade

मी तुमचे  आभारी  आहे की तुम्हि सांगितले की या कवितेत सारखा  अर्थ असलेली दूसरी पण कविता आहे..पण सांगेल  ही कविता मी लिहून  whtsup vr आणि ईतर site  vr टाकले  मी आता पर्यंत  खुप कविता लिहल्या  पण् स्वतच कधी कॉपी केल  नाहि ही कवीता  पण मी तेव्हढच प्रामाणिकपणाने लीह्लीली..कारण मी profession म्हणुन  नाहि  तर छंद  म्हणुन  लीहते...

spatankar_13

छंद जोपासावा स्वतःचा

भावना मांडाव्या खुशाल

वाचन वाढवावे भरपूर

ना घेता वादाची मशाल II

टाळावी शनी साडेसाती

माराव्या फेऱया वडाला

मारुती मंदिरास जावे शनिवारी

अन्यथा आपले छंदांची होईल माती II

बिलंदर असती जागो जागी

सुधारा स्वतःस आत्ताच

अन्यथा बिलंदर ठेवतील

तुम्हास तुमच्या जागी II

शुभम भवतू

sneha kukade