क्षमा...एक नंबरी

Started by Mayoor, December 30, 2009, 01:17:45 PM

Previous topic - Next topic

Mayoor


एक वयोवृद्ध फ्रेंच गृहस्थ क्षमायाचनेसाठी चर्चमध्ये गेले. अत्यंत नम्र स्वरात ते धर्मगुरूला म्हणाला, ''माझ्याकडून घडलेल्या पापाबद्दल मला क्षमा असावी, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एका मध्यरात्रीच्या सुमारास एका सुंदर स्त्रीनं माझ्या घराचा दरवाजा ठोठावला. तिला आत घेतल्यानंतर तिनं स्वत:ला शत्रूपासून वाचविण्याची मला विनंती केली. दया येऊन मी तिला माझ्या घरातील माळ्यावर लपविलं.''
'मित्रा,  यात  क्षमा मागण्यासारखं तुझ्याकडून काहीच घडलेलं नाही.' धर्मगुरू, म्हणाले, ''उलट आसऱ्यासाठी आलेल्या एका असहाय अबलेला आश्रय देऊन तू एक महान कार्यच केलंस.''
'होय,' गृहस्थ म्हणाले, ''परंतु कृतक्षतेच्या पोटी म्हणा किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या कारणानं म्हणा, तिनं मला अनेकदा शरीरसुख दिलं आणि मी पण तिला भरपूर प्रतिसाद दिला.''
'युद्धकाळात अशा गमतीशीर घटना घडतातच,' धर्मगुरू म्हणाले, ''तुम्हाला तुमच्या कृत्याचा खरोखरच पश्चात्ताप होत असेल तर तुम्ही क्षमेला पात्र आहात.''
'माझ्या मनावरचं मोठंच ओझं दूर झालं,' गृहस्थ म्हणाले, 'एक प्रश्न विचारू का?'
'अवश्य', धर्मगुरू म्हणाले.
''माळ्यावरच्या जागेला ती आता चांगलीच सरावली आहे, तरीही युद्ध संपल्याचं तिला सांगणं आवश्यक आहे का?''

santoshi.world