athvani

Started by shivanimore, July 06, 2016, 03:39:53 PM

Previous topic - Next topic

shivanimore

आठवणींची पाने उगीच केव्हातरी चाळावी
भिजून चिंब झालेल्या क्षणांना
नव्याने प्रेमाची फोडणी द्यावी
जुन्या फाटलेल्या पानांवर
प्रेमाचा वर्षाव करावा
जुन्याच आठवणी
नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करावा
असेल जरी एखाद पान
मनाला टोचणार
सार काही विसरून
त्याला हृदयाशी धरावं
आणि
पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडावं ....... 
                           
                                                शिवानी .........

ajaykumar

खूप छान

बिलंदर

आठवणीची पाने उगाच चाळावी
भिजलेल्या तुझ्या माझ्या क्षणाची वाटणी करावी

जुन्या फाटलेल्या पानावर करावा प्रेमाचा वर्षाव
जुन्या आठवणीना परत लिहिण्याचा मान्य करावा ठराव

असतील काही पाने मनाला टोचणारी
काही असतील हृदयाला भिडणारी

आपण मात्र पुन्हा एकदा प्रेमात पडावे