मनाच्या कोऱ्यापानातुन.

Started by Dnyaneshwar Musale, July 08, 2016, 10:43:23 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

तु अशी तु तशी
हवी आहे जशी आहे तशी,
एक एक तास बुडवून बसायचो
माझं जग सोडुन मी तुझ्या जगात असायचो,
मी तुझ्यासोबत जास्त वेळ घालवायचो
भुकेलेलेला असलो तरी भुक मारून तुला घेऊन सायकल चालवायचो,
तुझा अभ्यास असावा पूर्ण
असच वाटायचं मला भले माझा अपुर्ण,
मी कधी तुला विचारल नाही
तुझ्या मनात आहे का काही,
मी तुझ्यात जणु सामावुन गेलो होतो पुरा
जसं कागद सामावतो शाई,
तु मला विचारायची दिवस भर काय करत असतो
पण मी काय सांगणार तु उच्चारलेला एक एक शब्द
माझ्या कोऱ्या कागदावर कोरत असतो,
आणि तेच पाठांतरासारखं बडबडत असतो
ते शब्द चमकत असत मोहुन टाकणाऱ्या काजव्यासारखं,
कधी तु अलगद चिमटा काढुन हसायची
मला जेव्हा हसु यायचं तेव्हा तु मात्र नसायची,
जेव्हा तु तुझ्या केसांना पिना ऐवजी रुमाल बांधुन यायची
तेव्हा सारी पोर तुझ्याकडेच पाहायची,
त्यावेळी मला त्यांचा खुप  यायचा राग
पण त्यांना कस सांगणार तु आहेस माझ्या हृदयाचा एक भाग,
खिशात पैसा नसला तरी एक एक चिल्लर गोळा करायची
अन दुसऱ्या दिवशी तुझ्या सोबत चहाची एक फुसकर मारायची,
बरेच दिवस असे प्रेमात गेले
तेव्हा समजलं आपले काही दिवस कोरडेच गेले,
तु तुझ्या रस्त्याने अगदी खुशीत निघुन गेली
पण पुन्हा प्रेम करण्याची माझी  इच्छाच चिरडुन गेली,
खरंतर
तुझ्याही घरी छान गुलाबाची झाडे   होती
माझ्या घरी अगदी तशीच रंगीबिरंगी
पण फरक एवढाच की
तुझ्या घरची झाडे सुंदर अशा बागेत वाढली
होती ,
अन माझ्याकडचे गुलाब वाढले फक्त सांडपाण्याच्या पाण्यात.
पण समजवुन सांगता येत नव्हतं,
दोन्ही सुंदर आहे वेगळं म्हणावं तर फक्त तुझ्या सारखी बाग माझ्या घरी नव्हती,
पण फुलं मात्र दोन्हीकडची फुलणारीच होती,
खरचं आज ही तु हवी आहेस अगदी जशी आहेस तशीच.