*मला जगायचंय*

Started by ηأκнأl η. βοlε, July 11, 2016, 01:29:12 PM

Previous topic - Next topic

ηأκнأl η. βοlε

पुढे अजुन जगायचंय मला...
माझ्या चरीत्राला आकार द्यायचाय,
शिकायचय भरपूर अजुन,
माझ्याच आयुष्याला रस्ता द्यायचाय....

मला वेलींचा आधार व्हायचंय,
झाडांच मला मूळ व्हायचंय,
फळांच्या बिया आणि,
फुलांचा मला सुगंध व्हायचंय...

मला समुद्राची लाट व्हायचंय,
शांततेची मला वाट व्हायचंय,
नदीचा किनारा मला आणि,
आनंदाची बेधुंद पहाट व्हायचंय...
:-)