*पहिलं वहिलं प्रेम सखे*

Started by ηأκнأl η. βοlε, July 14, 2016, 12:45:16 PM

Previous topic - Next topic

ηأκнأl η. βοlε

पहिलं वहिलं प्रेम सखे,
तुझ्या सौंदर्यावर झालं होतं...
सत्यात तु असल्यामुळे,
मन ही बेधुंद झालं होतं..

पहिलं वहिलं प्रेम सखे,
तुझ्या डोळ्यांशी झालं होतं...
तुझ्याच डोळ्यात स्वत:ला मग ,
शोधनं ही चालू होतं...

पहिलं वहिलं प्रेम सखे,
तुझ्या शब्दांशी झालं होतं...
बोलताना तुझ्याशी,
मनही हरवून गेलं होतं...

पहिलं वहिलं प्रेम सखे,
तुझ्या अस्तित्वाशी झालं होतं...
तुझ्या असण्यामुळेच मन,
आनंदीत झालं होतं...

पहिलं वहिलं प्रेम सखे,
तुझ्या स्वप्नांशी झालं होतं...
माझीच स्वप्ने समजून त्यांना,
साकारणं ही चालू होतं...

पहिलं वहिलं प्रेम सखे,
फक्त तुझ्याशीच झालं होतं...
फक्त तुझ्याशीच झालं होतं...

---------------s----------------

निखिल
मुर्तिजापुर, जिल्हा-अकोला
8550951989

Shrikant R. Deshmane

khup chan nikhil ji..

पहिलं वहिलं प्रेम सखे,
तुझ्या अस्तित्वाशी झालं होतं...
तुझ्या असण्यामुळेच मन,
आनंदीत झालं होतं...

aavdla.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]